Pune : लग्न झाल्याचे लपवून टिक टॉकवर झालेल्या ओळखीतून 22 वर्षीय तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज : टिक टॉक वर (Pune) झालेल्या ओळखीनंतर लग्न झाल्याचे लपवून एका व्यक्तीने 22 वर्षे तरुणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. चंदन नगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 2019 ते 2022 या कालावधीत हा सर्व प्रकार घडला.

विजय सुरेश बनसोडे (वय 37, रा. अंधेरी, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेले आरोपीचे नाव आहे. 22 वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

Pune : नवले पूल परिसरात आणखी एक अपघात, महामार्गावर पिकप गाडी पलटली

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, 2019 मध्ये आरोपी आणि फिर्यादी यांची टिकटॉक ऍपवरून ओळख झाली होती. या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने पहिले लग्न झाल्याचे फिर्यादी यांचे पासून लपवून ठेवले. त्यानंतर त्यांना लग्नाचे आमिष दाखवून फिर्यादी यांच्या घरी आणि पुणे स्टेशन परिसरातील लॉजवर वारंवार घेऊन जात त्यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करून हे चित्रीकरण फिर्यादीला पाठवले आणि नातेवाईकांना पाठवण्याची भीती घालून फिर्यादी यांना ठार मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.