Pune : जुन्नर तालुक्यातील 27 वर्षीय माजी सरपंचाचा कोरोनामुळे मृत्यू

A 27-year-old former sarpanch of Junnar taluka died due to corona

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. जुन्नर तालुक्यातील एका गावातील 27 वर्षीय माजी सरपंचाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

हा माजी सरपंच कोरोनाबाधित असल्याचे सात जुलै रोजी निष्पन्न झाले होते. त्यानंतर उपचारासाठी त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आज, बुधवारी पहाटेच्या सुमारास उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

या तरुण माजी  सरपंचाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

याआधी कोरोनामुळे मृत्युमुखी पडणा-यांमध्ये 60 वर्षावरील रुग्णांचा सहभाग होता. परंतु, आता याहून कमी वयाचे रुग्ण कोरोनाचे बळी पडताना दिसत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like