Pune : बांधकाम साईटवरील सळयांच्या तुकड्यांचा गट्टू डोक्यात पडून 9 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – शाळा सुटल्यानंतर आईचे बोट धरून घरी जाणाऱ्या 9 वर्षाच्या रुद्रचा डोक्यात बांधकामाच्या ( Pune) सळ्यांच्या तुकड्यांचा गट्टू पडून मृत्यू झाला आहे. याच्या या अकाली मृत्यूला केवळ बांधकाम व्यावसायीकांकडून सुरक्षिततेच्या बाबतीत केलेला हलगर्जीपणा कारणीभूत मानला जात आहे.

रुद्र केतन राऊत (वय 9 रा. श्रीनाथ सोसायटी, वीरभद्रनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. याबाबत त्याची आई पूजा केतन राऊत (वय 30) यांनी चतु:शृगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संबंधित बांधकाम व्यावसायिक, अभियंता, बांधकाम ठेकेदार आणि कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका कामगाराला रात्री अटक करण्यात आली. हेमंत आनंद मंडल (वय 32, रा. वाकड, मूळ रा. पश्चिम बंगाल) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

Global Warming : हवामान संकटाने फक्त मानवासह इतर सजीवही निर्वासित – ग्रीक चित्रपट निर्माते अँजेलोस रॅलिस

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि.22) शाळा सुटल्यानंतर दुपारी पावणेतीनच्या सुमारास अवघ्या नऊ वर्षांचा रुद्र राऊत आनंदाने बागडत, आईचे बोट पकडून मस्त गप्पा मारत घरी निघाला होता. काही कळायच्या आतच तो अचानक जमिनीवर खाली पडला. बाणेर येथील गणराज चौकाजवळ ओम हाउसिंग बांधकाम व्यावसायिक कंपनीच्या इमारतीचे काम सुरू असताना ही घटना घडली.

इमारतीवरून सळईच्या तुकड्यांचा गट्टू रुद्रच्या डोक्यात पडल्याने तो गंभीर जखमी झाला. दुर्घटनेत रुद्र ची आई थोडक्यात बचावली. रुद्रला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे करत ( Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.