Pune : 9 वर्षीय मुलीला घरात बोलावले अन् … , 35 वर्षीय शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य

एमपीसी न्यूज- घराशेजारी राहणाऱ्या 9 वर्षे मुलीला स्वतःच्या घरात ( Pune) बोलावून तिच्यासोबत अश्लील कृत्य केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील घोरपडीत एक ते चार जून या काळात वेळोवेळी घडला आहे. पीडित मुलीच्या आईने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

त्यानुसार आरोपी गोमाजी रामा गायकवाड (वय 35) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीच्या घराशेजारीच राहतो. त्यामुळे ते एकमेकांना चांगले ओळखतात. त्यांचे एकमेकांच्या घरी येणे जाणे देखील होते. दरम्यान आरोपीने एक जून ते चार जून या कालावधीत फिर्यादी यांच्या नऊ वर्षीय मुलीला राहत्या घरामध्ये बोलावले आणि तिच्यासोबत अश्लील कृत्य केले.
याविषयी कुणाला काही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मात्र पीडित मुलीने आईला हा प्रकार सांगितल्याने आईने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास मुंढवा पोलीस ( Pune) करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.