Pune : अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

A Biker who was seriously injured in a collision with an unknown vehicle died during treatment : अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू

एमपीसी न्यूज : अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुणे – सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाणपुलावर तीन दिवसांपूर्वी पहाटे सहाच्या सुमारास हा अपघात घडला होता.

सत्यनारायण राजाराम ठाकर (वय 37) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांपूर्वी पहाटे सहाच्या सुमारास  सत्यनारायण ठाकर दुचाकीवरून पुणे सातारा रस्त्यावरील शंकर महाराज उड्डाण पुलावरून जात होते.

त्यावेळी भरधाव आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार ठाकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना  त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, अपघातानंतर अज्ञात वाहन चालक घटनास्थळी न थांबता पसार झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like