Pune : जनता वसाहतीजवळच्या कॅनॉलमध्ये पडला मुलगा; अग्निशामन दलाचे शोधकार्य सुरुच

एमपीसी न्यूज – पुण्यातील जनता वसाहती जवळच्या कॅनॉलमध्ये सकाळी अकराच्या सुमारास एक मुलगा पडल्याची माहिती अग्निशामन दलाच्या जवानांना मिळाली. जवानांनी शोधकार्य सुरु केलं आहे. मात्र, मुलाचा शोध अद्यापही लागला नाही.

सुरेश बागल (वय वर्ष 13 ) असं या मुलाचं नाव आहे. जनता वसाहतीजवळून एक कॅनॉल जातो. या कॅनॉलमध्ये सध्या खडकवासला धरणाचे बारामतीला जाणारं पाणी सोडल आहे.

या कॅनॉलमध्ये सकाळी मुलगा मित्रांबरोबर पोहायला गेला असता उडी मारल्यानंतर तो बुडाला आणि तसाच वाहून गेला. कँनॉलमधील पाण्याचा प्रवाहही जोराचा वाहता आहे. त्यामुळे मुलगा दूरवर वाहून गेल्याची शक्यता अग्निशामन विभागानं व्यक्त केली आहे. पानमळा ते मित्रमंडळ चौक इथपर्यत अग्निशामन दलाने स्थानिकांच्या मदतीने शोधाशोध केली मात्र मुलाचा शोध घेण्यात जवानांना अपयश आलं आहे.

पुणे शहरात वसाहतीच्या कडेला नाल्यात आणि कॅनॉलमध्ये मुलं पडण्याच्या घटनांत अलीकडे वाढ झाली आहे. कारण, नाल्याच्या कडेला काही ठिकाणी संरक्षक जाळ्या नाहीत. पाटबंधारे विभागाचा सुरक्षारक्षक कँनॉलवरती गस्त घालताना दिसत नाही त्यामूळे सध्या तरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

जनता अग्निशामन दलाने वरिष्ठ विभागाकडं या घटनेची माहिती पाठवली आहे. आता वरिष्ठ विभाग यावरती काय निर्णय घेऊन शोधमोहीम सुरु करणार कि नाही, हे पाहणं महत्वाच आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.