Pune : प्रेम संबंधातून एका विवाहीत महिलेच्या खूनप्रकरणी प्रियकरला अटक

एमपीसी न्यूज – नानापेठ पुणे येथे प्रेम संबंधातून झालेल्या भांडणातून प्रियकराने एका विवाहीत महिलेचा खून केल्याची घटना नुकतीच घडली होती. यानंतर मयत महिलेचा प्रियकर फरार झाला होता. तसेच तो नेहमी ठिकाणे बदलत पोलिसांना चकवा देत होता. अखेर याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

प्रेम जोधाराम माळी (वय-वर्षे ३२, रा. मुळा रोड, खडकी पुणे) संशयित आरोपीचे नाव असून त्याने गुन्हा कबूल केला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, नाना पेठ पुणे येथे एका विवाहीत महिलेचा खून करून तिचा प्रियकर प्रेम माळी, (रा. मुळा रोड, खडकी, पुणे) हा पळून गेला होता. तेंव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. परंतू तो त्याची रहाण्याची ठिकाणे बदलत असल्यामुळे पोलिसांना चकमा देत होता व मिळून येत नव्हता.

_MPC_DIR_MPU_II

युनिट-१, गुन्हे शाखा पुणे शहरकडील अधिकारी व स्टाफ युनिट १चे हद्दीत वरीष्ठांचे आदेशाने सराईत गुन्हेगारांचा शोध घेत असतांना पोलीस नाईक सचिन जाधव यांना त्यांचे खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, समर्थ पोलीस ठाण्यातील दाखल गुन्हयाचे खूनातील आरोपी हा स्वारगेट येथील पी.एम.टी. वर्कशॉपजवळ रस्त्यावर उभा आहे.

त्याने पांढर्‍या रंगाचे फुल बाहयाचे शर्ट व काळया रंगाची पँट घातली असून तो पळून जाण्याच्या तयारीत आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने हि सर्व माहिती वरिष्ठांना कळविली असता वरिष्ठांच्या आदेशानुसार युनिट-१, गुन्हे शाखा, पुणे शहर पथकाकडील स्टाफसह माहितीप्रमाणे त्या ठिकाणी जावून नमूद संशयितास 13.00 वा. ताब्यात घेतले. त्यांस त्याचे नांव पत्ता विचारता त्याने त्याचे नांव पत्ता प्रेम जोधाराम माळी असे असल्याचे सांगितले.

त्याचेकडे वरिल नमूद गुन्हयाच्या संदर्भाने विचारपूस करता त्याने दि.12/3/2020 रोजी समर्थ पोलीस ठाणे हद्दीत एका महिलेचा खून केल्याचे सांगितले. ‘तो’ खून त्याने प्रेमसंबंधातून झालेल्या भांडणाच्या कारणावरून केल्याचेही सांगितले. पुढील तपासकामी आरोपीस समर्थ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देणेत आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.