Pune : वीज कंत्राटी कामगारांना त्रास देणाऱ्या कंत्राटदारावर पुण्यात खटला दाखल

एमपीसी न्यूज – कंत्राटदार ऑल ग्लोबल सर्व्हिसेस या गोरेगाव (Pune) मुंबईच्या एजन्सीने कामगार कायद्याचे पालन न करता कामगारांना त्रास देत असल्याकारणाने एजन्सीवर खटला दाखल न झाल्यास 29 नोव्हेंबरला कामगार उप आयुक्त कार्यालयास टाळे ठोकून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाने दिला होता. त्यांनतर पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात आस्थापणावर खटला दाखल करण्यात आला व याबाबत संघटनेला लेखी स्वरूपात दिल्यानंतर संघटनेने आमरण उपोषण मागे घेण्यात आले आहे.

महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे उपमहामंत्री राहुल बोडके, पुणे झोन सचिव निखिल टेकवडे, महेश वाघमारे, सुधीर शेंडगे यांनी उपोषण केले. संघटनेचे अध्यक्ष निलेश खरात, कोशाध्यक्ष सागर पवार व भारतीय मजदूर संघाचे पुणे अध्यक्ष अर्जुन चव्हाण, पूर्ण वेळ कार्यकर्ते उमेश विश्वाद, निलेश गादगे यांनी मार्गदर्शन केले. कामगारांना प्रोत्साहन देण्यासाठी भोसरीचे अध्यक्ष मोहन भोसले, ईश्वर स्वामी, अविनाश जगताप, सूरज चव्हाण उपस्थित होते. तर, वीज कामगार महासंघाचे पुणे झोन अध्यक्ष माने यांनी सद्दीच्छा भेट दिली.

PCMC News: शहरात 10 जिजाऊ क्लिनिक उभारणार, दीड कोटींचा खर्च

महावितरणमधील नियमित मंजूर रिक्त पदांच्या विविध जागेवर कंत्राटदार ऑल ग्लोबल सर्व्हिसेस (Pune) या गोरेगाव मुंबईच्या एजन्सीच्या वतीने पुणे, कोल्हापूर, पनवेल, भांडुप, रत्नागिरी येथे कामगार पुरवले होते. ही एजन्सी कधीच कामगार कायद्याचे वा नियमाचे पालन करत नाही, कामगारांना PF ESIC पेमेंट स्लीप व अन्य सुविधा सुरक्षा साधने वेळेत आजवर कधी पुरवली नाही, त्यामुळे त्यांचे लायसन रद्द करून काळ्या यादीत टाकण्यासाठी महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) संघटनेने अनेक आंदोलने केली.

8 ऑगस्ट 2022 रोजी खटला भरू या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता कामगार उपआयुक्त कार्यालयाकडून झाली नसल्याने भारतीय मजदूर संघ संलग्नीत महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने सोमवार दि. 28 नोव्हेंबर रोजी कामगार उप आयुक्त कार्यालय वाकडेवाडी पुणे येथे आमरण उपोषण सुरू केले होते. कामगारांना वेळेवर वेतन न देणे, रोजगारासाठी पैश्याची मागणी करणे, पैसे न दिल्यास कामावरून कमी/बदली करण्याची बदली धमकी देणे, कोर्ट संरक्षित कामगारांना कामावरून कमी करणे तशा ऑर्डर देणे या बाबीमुळे कामगार आक्रमक झाले. त्यामुळे सदर एजन्सीवर खटला दाखल न झाल्यास 29 नोव्हेंबरला कामगार उप आयुक्त कार्यालयास टाळे ठोकून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला त्यांनतर शिवाजीनगर कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे.

कामगार उप आयुक्त अभय गीते यांनी कारवाई केली.पुण्या या एजन्सीवर कोल्हापूर मध्येही खटला दाखल झाला पाहिजे अशी भूमिका संघटनेने अप्पर कामगार आयुक्त पुणे शैलेंद्र पोळ यांच्या पुढे मांडली असता त्यांनी तात्काळ कोल्हापुरातील कामगार उप आयुक्त यांना फोनवर सूचना दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.