Pune: लहान मुलांचे अश्लील फोटो युट्यूबवर टाकल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Pune: A case has been registered against a person for uploading child pornography on YouTube लहान मुलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे आणि अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत.

एमपीसी न्यूज- लहान मुलांचे अश्लील फोटो युट्यूबवर टाकल्याप्रकरणी एका व्यक्तीवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादाराव सरवदे (धायरी) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर आयटी अ‍ॅक्‍टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लहान मुलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे आणि अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आलेले आहेत. त्यानुसार सायबर पोलीस अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करतात.

त्यानुसार सिंहगड पोलिसांनी धायरी येथे राहणाऱ्या दादाराव सरवदे या व्यक्तीवर आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.