Pune : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात तोडफोड करुन गोंधळ प्रकरणी अभाविपच्या कार्यकर्त्यांंविरुद्ध गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज-अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 20 कार्यकर्त्यांंविरुद्ध (Pune ) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात तोडफोड करुन गोंधळ घातल्या प्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी विद्यापीठातील सुरक्षा अधिकारी सुधीर दळवी (वय 50) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून  अभाविपचे कार्यकर्ते गंगा महादेव, अनिल ठोंबरे, अंबादास अभिनवे, शुभंकर बाचाल, अमोल देशपांडे, मित ठक्कर, पवन पिनाटे यांच्यासह 15 ते 20 कार्यकर्त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chakan : साईबाबा पतसंस्थेची निवडणूक वादात; मध्यरात्री मतमोजणी स्थगित

विद्यापीठाच्या आवारातील बेकायदा रॅपगीत चित्रीकरण तसेच विविध मागण्यासंदर्भात अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी विद्यापीठाच्या आवारात घोषणाबाजी करुन आंदोलन केले. त्या वेळी विद्यापीठातील सुरक्षा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला.विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील दरवाजाला कार्यकर्त्यांनी धक्के दिले. बैठक कक्षात शिरलेल्या कार्यकर्त्यांनी कागद फाडले तसेच काच फोडली. घोषणाबाजी करुन गोंधळ (Pune ) घातला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.