Pune : भाजप नेते गणेश बिडकर यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गणेश बिडकर (Pune) यांच्यासह चार जणांवर पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेश बिडकर आणि त्यांचे सहकारी पैसे वाटत असल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर बिडकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकाला बेदम मारहाण केली.

गणेश बिडकर, मयूर चव्हाण, नईम शेख आणि बाला शेख अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी फैयाझ कासाम शेख यांनी तक्रार दिली आहे. मंगळवार पेठेतील मालधक्का चौकातील आयशा कॉम्प्लेक्स मध्ये रविवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार हे काँग्रेस पक्षाचे युवक काँग्रेसचे पुणे कॅन्टोन्मेंट मतदार संघाचे माजी अध्यक्ष आहेत. रविवारी दुपारी ते मालधक्का चौक परिसरात असताना भाजपचे काही कार्यकर्ते हे मतदारांना पैसे वाटत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती.

Pune : नृत्यांगणा गौतमी पाटीलचा अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल

त्यानंतर फिर्यादी खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता गणेश बिडकर (Pune) यांच्यासह इतर आरोपी त्या ठिकाणी उभे होते. त्यांच्या हातात केशरी रंगाची पिशवी आणि मतदारांच्या स्लिपा दिसल्या. हातातील पिशवीमध्ये पैसेही होते. याविषयी विचारणा केली असता आरोपींनी फिर्यादी यांना मारहाण करून त्या ठिकाणाहून पळून गेले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.