Pune : मस्जिदमध्ये फिरणाऱ्या ‘त्या’ आठ विदेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लॉकडाऊनच्या काळात क्वारंटाईनचे आदेश असतानाही पुण्यातील वेगवेगळ्या मस्जिदमध्ये फिरणाऱ्या आठ विदेशी नागरिकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे सर्व टांझानिया देशातील नागरिक असून ‘टुरिस्ट विझा’वर 11 मार्च रोजी भारतात आले होते.

दिल्लीतील निझामुद्दीन मरकस येथील घटनेनंतर पोलिसांनी या सर्वांना क्वारंटाईन केले होते. त्यानंतरही हे सर्व 24 ते 29 मार्च दरम्यान पुण्यातील वेगवेगळ्या मस्जिदमध्ये फिरत राहिले. पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर आठही जणांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिल्लीत झालेल्या मरकस येथील कार्यक्रमाचा आणि आठ लोकांचा काही संबंध नाही. परंतु हे सर्व तब्लिगी जमातीशी संबंधित आहेत. पोलिसांनी 24 मार्च रोजी या सर्वांची तपासणी केली असून यातील कोरोना बाधित कोणीही नाही.. परंतु त्यानंतरही त्यांनी वेगवेगळ्या मस्जिदमध्ये हजेरी लावल्याने पुन्हा एकदा त्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.