Pune: डॉक्टरच्या मुलाला कोरोना झाल्याची अफवा पसरवल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

Pune: A case has been registered against four persons for spreading rumors that a doctor's son had a corona पाषाणच्या पंचवटीतील मंत्री अव्हेन्यू या उच्चभ्रू सोसायटीत घडलेला प्रकार

एमपीसी न्यूज – डॉक्टर महिलेच्या मुलाला कोरोना झाल्याची अफवा पसरवून त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यास (बॅन करण्यास) सोसायटीतील लोकांना सांगितल्याच्या आरोपावरून चौघां विरोधात पुण्यातील चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

याप्रकरणी डॉ. स्नेहा सम्राट घोरपडे (वय 47) यांनी तक्रार दिली असून अनिल शिवबच्चन गिरी, अमित कुमार गिरी, सतीश रेगे यांच्यासह एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार पाषाणच्या पंचवटीतील मंत्री अव्हेन्यू या उच्चभ्रू सोसायटीत घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकाच सोसायटीत राहतात. फिर्यादीच्या मुलाला कोरोना झालेला नसतानाही आरोपींनी त्याला कोरोना झाल्याची अफवा संपूर्ण सोसायटीत पसरवली.  तसेच ‘सोहम कोविड पेशंट असून त्याला  बॉयकोट करा, मारहाण करा असे सोसायटीतील इतर सभासदांना सांगितले.

तसेच सोसायटीने मिटींग बोलून त्यांच्यावर कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र सोसायटीला दिले. तसेच फिर्यादीच्या मुलाला आरोपीने लोखंडी रॉडने मारहाणही केली. तर आरोपी अमित गिरी आणि अमोल गिरी यांनी फिर्यादीच्या घरासमोरच जात ‘गो कोरोना गो’ म्हणत त्यांच्या दारात थुंकले, असे फिर्यादीत म्हटले आहे.

फिर्यादी महिलेने तक्रार दिल्यानंतर चतुःश्रुंगी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राकेश सरडे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.