Pune : कंपनीची गोपनीय माहिती चोरल्या प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – कंपनीच्या नोकरीचा राजीमाना दिल्यानंतर (Pune) एक्झीट फॉर्म भरण्याच्या बहाण्याने कंपनीचा लॅपटॉप वापरून त्याद्वारे कंपनीची गोपनीय माहिती चोरल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हा प्रकार 29 एप्रिल रोजी के.एस.बी कंपनी येथे घडला आहे.

याप्रकरणी बुधवारी (दि.24) नितीश दत्तात्रय कुलकर्णी (वय 33 रा.सिंहगड रोड) यांनी फिर्याद दिली असून चंद्रकांत बाळासाहेब कड (रा. हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने कंपनीच्या नोकरीचा राजीनामा दिला होता. त्याने कंपनीत येत एक्झीट फॉर्म भरण्याच्या बहाण्याने कंपनीतील एका एम्प्लॉयीचा लॅपटॉप घेत त्याद्वारे कंपनीच्या कन्सोलीडेटेड फाईल ऑफ व्हेरीएबल कॉस्ट तसेच कंपनीते विविध प्रोडक्टस यांची माहिती, न्यू डेव्हलप पंप मॉडेल्स अशी गोपनीय माहिती चोरून ती स्वतःच्या मेलवर घेतली व तो मेल डिलीट करत पुरावे नष्ट केले. यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.