Pune : बेकायदेशीरपणे मांस वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे मांस वाहतूक केल्याप्रकरणी शिरगाव परंदवडी (Pune) पोलिसांनी एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. 22) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाका येथे असलेल्या पोलीस चौकीजवळ करण्यात आली.
मेहबूब शमशुद्दीन मेंदर्गीकर (वय 45, रा. वळसंग, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार अजित शिंदे यांनी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Ravet : काम सोडलेल्या चालकाने केला तीस हजारांच्या डिझेलचा अपहार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मेहबूब याने त्याच्या ताब्यातील टेम्पोमध्ये 12 लाख रुपये किंमतीचे पाच टन म्हैस वर्गीय जनावरांची कत्तल करून मांस भरले. ते मांस वाहतूक करत असताना उर्से टोल नाका येथे पोलिसांनी पकडले. आरोपीकडे जनावरांची कत्तल करण्याचा परवाना व पशुवैद्यकीय प्रमाणपत्र नसताना त्यांनी (Pune) बेकायदेशीरपणे वाहतूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलीस तपास करीत आहेत.