Pune: वडगावशेरी मतदारसंघात आणखी एका नगरसेविकेच्या कुटुंबातील सदस्याला कोरोना 

Pune: A family member of another corporator in Wadgaon Sheri constituency, detected corona positive

एमपीसी न्यूज – वडगाव शेरी मतदारसंघात आणखी एका नगरसेविकेच्या घरातील सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

पुणे महापालिकेच्या नगरसेवकांना कोरोनाची सातत्याने लागण होत आहे. यापूर्वी याच मतदारसंघात एका नगरसेविकेला कोरोनाची लागण झाली होती. नगरसेवकांचा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर होत असल्याने कोरोना होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

पुणे महापालिकेच्या महिला पदाधिकारी आणि त्यांच्या पतीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर काँग्रेस नगरसेवकाला कोरोना झाला होता. सर्वसाधारण सभेत या नगरसेवकाने हजेरी लावली होती. त्या दिवशी 90 पेक्षा जास्त नगरसेवक हजर होते. त्यामुळे इतर नगरसेवकांमध्येही घबराट निर्माण झाली आहे.

मागील चार महिन्यांत कोरोनाचे संकट पुणे शहरात गंभीर झाले आहे. या कालावधीत सर्वोपक्षीय नगरसेवकांनी आपापल्या प्रभागातील नागरिकांना अन्नधान्य वाटप, जेवण वाटपासून ते आरोग्य साहित्य पुरविण्यावर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे. जनतेत मिसळताना, सार्वजनिक ठिकाणी पाहिजे त्या प्रमाणत खबरदारी घेतली नाही. त्यामुळे पुणे महापालिकेच्या नगरसेवकांना कोरोना होत असल्याचे समोर येत आहे.

वडगाव शेरी मतदारसंघातील एका नगरसेविकेला काही दिवसांपूर्वी कोरोना झाला होता. त्याचा भागात एका नगरसेवकाच्या घरातील सदस्याला कोरोना झाला होता. आता याच भागातील आणखी एका नगरसेविकेच्या घरातील सदस्याला कोरोना झाला आहे.

काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर मतदारसंघात एका नगरसेविकेच्या घरातील सदस्याला कोरोना झाला होता. पुणे महापालिका महिला पदाधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांनाही कोरोनाची लागण झाली आहे.  जवळपास 10 ते 12 नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाला आहे. त्यामुळे आता इतर नगरसेवकांनी आणखी सावध होण्याची गरज निर्माण झाली आहे.

‘मला काहीही होणार नाही’, असे वागून चालणार नाही. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायजर लावणे, वारंवार हात धुणे, बाहेरून आल्यावर अंगोळ करणे आवश्यक असल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. पुणे शहरात आता कोरोनाचे 12 हजार 686 रुग्ण झाले आहेत. तर, तब्बल 518 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या नागरिकांना कोरोना व्यतिरिक्त इतरही आजार होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.