Pune :स्मार्ट सिटी कार्यालयाकडील ‘कंपनी सेक्रेटरी आणि ‘चिफ नॉलेज ऑफिसर’ ही पदे नव्याने भरा -पृथ्वीराज सुतार

एमपीसी न्यूज – पुणे स्मार्ट सिटी कार्यालयाकडील ‘कंपनी सेक्रेटरी’ आणि ‘चिफ नॉलेज ऑफिसर’ ही पदे नव्याने भरण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे.

सध्या कार्यरत असलेले कंपनी सेक्रेटरी यांचा सेवाकाल दि. 13 फेब्रुवारी 2020 रोजी व चिफ नॉलेज ऑफिसर यांचा सेवाकाल दि. 20 मार्च 2020 रोजी संपुष्टात येत आहे. दि. 1 फेब्रुवारी 2020 रोजी संचालक मंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार ही पदे नव्याने जाहिरात देऊन भरण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार संचालक मंडळाच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे कंपनी सेक्रेटरी या पदासाठी 75 हजार रुपये, चिफ नॉलेज ऑफिसर या पदासाठी 1 लाख रुपये मासिक वेतनासह शैक्षणिक पात्रता इत्यादीचा समावेश करून भरती प्रक्रिया 1 महिन्याच्या आत पूर्ण करण्यात यावी.

_MPC_DIR_MPU_II

या अधिकाऱ्यांना त्यांचे करार संपुष्टात येणाऱ्या दिनांकापासून पुढे भरती प्रक्रिया होईपर्यंत तात्पुरती मुदतवाढ दिल्यास त्यांना वर उल्लेख केलेल्या मासिक वेतनाच्या प्रमाणात जेवढे दिवस मुदतवाढ दिली असेल, तेवढ्या दिवसांचीच रक्कम मानधन म्हणून अदा करण्यात यावी.

ही पदे भरताना पुणे स्मार्ट सिटीत वरील पदांवर कार्यरत असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना या भरती प्रक्रियेत भाग घेता येणार नाही, याची खबरदारी घ्यावी. या भरतीचे वेळापत्रक निश्चित करून त्याबाबत माहिती द्यावी, असेही पृथ्वीराज सुतार यांनी म्हटले आहे. यासंबंधीचे निवेदन पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.