Pune : हडपसर येथील सातववाडी परिसरात मध्यरात्री हॉटेलला आग , जिवीत हानी टळली

एमपीसी न्यूज –   हडपसर जवळील सातववाडी येथील ( Pune ) साईनगर सोसायटीच्या तळमजल्यातील भन्नाट बिर्याणी या हॉटेलमध्ये आग लागून नुकसान झाले. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने हॉटेलमध्ये कोणी राहत नसल्याने जीवितहानी टळली. येथील रस्त्यालगत असलेल्या साईनगर इमारतीमध्ये अमित अदमानी यांचे दुकान असून त्यांनी ते केतन शिंदे यांना भन्नाट बिर्याणी या हॉटेल व्यवसायासाठी भाडेकराराने दिले आहे. रविवारी (दि.11) पाहटे तीन वाजण्याच्या सुमारास या हॉटेल मधून धूर येत असल्याचा फोन अग्निशमन केंद्रात आला होता.

CAPF : केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात कॉन्स्टेबल पद भरतीसाठी प्रथमच होणार 13 भाषांमध्ये परीक्षा; मराठीचाही समावेश

तात्काळ काळेबोराटेनगर, हडपसर व कोंढवा येथून अग्निशमन दलाची वाहने येऊन आगीवर नियंत्रण मिळवले. जवानांनी दुकानातून एक कमर्शियल, एक रेसिडेन्शियल व एक पाच किलोचा सिलेंडर बाहेर काढला. या आगीत एका सिलेंडर फुटले आहे.आगीमध्ये फ्रिज, पाण्याच्या दोन टाक्या, पातेले, शेगडी, टेबल, काउंटर, खुर्च्या इत्यादी वस्तूंचे नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

काळे बोराटेनगर अग्निशामन केंद्रप्रमुख अनिल गायकवाड, राजू शेख, नारायण जगताप, फायरमन अनिमेश कोंडगेकर, केतन घाडगे, संकेत शिंदे, बाबासाहेब चव्हाण, चंद्रकांत नवले यांनी आगीवर नियंत्रण ( Pune ) मिळविले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.