रविवार, सप्टेंबर 25, 2022

Pune : शहरात वाहनचोरी आणि घरफोड्याचा धुडगूस घालणाऱ्या टोळीस अटक

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील मागील चार महिन्यांपासून चारचाकी वाहने चोरून घरफोड्या करणाऱ्या अट्टल सराईत शिकलकरी टोळीस हडपसर भागातील रामटेकडी तेथून अटक करून 19 गुन्हे उघडकीस आणून तब्बल 21 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

करणसिंग रजपुतसिंग धुधाणी(वय 20, रा.रामटेकडी, हडपसर), सुरजितसिंग राजपालसिंग टाक(वय  28, रा. बिराजदारनगर हडपसर), बेन्तुसिंग शामसिंग कल्याणी(वय 23, रा.रामटेकडी, हडपसर), रोहन प्रकाश कांबळे(वय 21, रा.रामटेकडी, हडपसर), उध्दलसिंग राजुसिंग दुधानी(वय 28, रा. रामटेकडी, हडपसर), रियाज शब्बीर सय्यद(वय 37) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पुणे शहरात मागील चार महिन्यांपासून नागरिकांना आणि वाचमन ला शस्त्रांचा धाक दाखवून चारचाकी वाहने चोरून त्याचा वापर घरफोड्या करण्यासाठी करणाऱ्या अट्टल सराईत टोळीला कोंबिंग ऑपरेशन करून अटक केली.पोलिसांनी त्यांना अटक करून सखोल तपास केला असता या टोळीने पुणे शहरातील वेगवेगळ्या ठिकाणची चारचाकी वाहने चोरून घरफोड्या केल्याचे उघडकीस आले आहे.पोलिसांनी आरोपींकडून एकूण 18 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून तब्बल 21 लाखांचा माल हस्तगत केला.

एवढेच नाही तर करणसिंग दुधानी हा सुप्रसिद्ध लेखक पु.ल.देशपांडे यांच्या घरी झालेल्या घरफोडीतील फरार आरोपी असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे.तर राजुसिंग दुधानी याने पोलीस अधिकारी रामचंद्र घुगे यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. ही कामगिरी गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदिप देशपांडे आणि पोलीस अप्पर आयुक्त शिरीष सारदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

spot_img
Latest news
Related news