रविवार, जानेवारी 29, 2023

Pune : किल्ल्याच्या आकारातच बांधले घर; शिवरायांच्या विचाराचा वारसा जपण्यासाठी तरुणाचा पुढाकार

एमपीसी न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज हे (Pune) संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. महाराजांच्या विचारांचा पगडा राज्यातील अनेकांवर आहे. शिवरायांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी अनेकजण प्रयत्नही करताना दिसतात. यासाठी वेगवेगळे प्रयोगही केले जातात. असाच काहीसा प्रयोग पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खामगाव येथील एका तरुणाने केला. या तरुणाने घराला चक्क किल्ल्याचे स्वरूप दिले आहे. या तरुणाने केलेला हा प्रयोग अनेकांना आवडला आहे. अनेकजण त्याचं घर पाहण्यासाठी त्याच्या घरी भेट देत आहे.

निलेश जगताप असे या तरुणाचे नाव आहे. निलेश जगताप हा शेतकरी कुटुंबातील असून तो पशुवैद्य आहे. घर बांधताना या तरुणाने घराच्या चहुबाजूने चिरा जांभा दगड बसवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पावस इथून त्याने हे दगड आणले असून घराच्या चारही बाजूला बुरुजाचा आकार देण्यात आला आहे. इतकेच नाही तर घराच्या दरवाजाजवळ स्वागत कमान देखील बांधण्यात आली आहे. याशिवाय घराच्या बाहेरच्या बाजूला कंदिलाच्या आकाराचे दिवे लावण्यात आले आहेत. हे घर बांधण्यासाठी या तरुणाला जवळपास एक कोटी रुपयांचा (Pune) खर्च आला आहे. या घराला आतून सर्व पारंपारिक घरासारखा लोक देण्यात आला आहे.

Pune Crime : बिल्डरचे खाजगी फोटो व्हायरल न करण्यासाठी 8.3 कोटी रुपयांची मागणी

Latest news
Related news