Pune : कर्डेच्या सरपंचांवर जीवघेणा हल्ला आणि जबरी चोरी प्रकरणातील सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने केले गजाआड

एमपीसी न्यूज – पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने सराईत गुन्हेगाराला अटक केली. अटक केलेल्या आरोपीने त्याच्या साथीदारासोबत मिळून कर्डे गावच्या सरपंचांवर जीवघेणा हल्ला करून चोरी केली आहे. नागरिकांनी घटनेनंतर एकाला पकडून पोलिसांकडे दिले. तर दुस-या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले.

अमोल विश्वास ओव्हाळ (रा. वृंदावन, रामनगर, पेरणेफाटा, ता. हवेली) असे अटक केलेल्या सराईत आरोपीचे नाव आहे.

कर्डे गावच्या सरपंच सुरज बांदल यांच्यावर दोन जणांनी मिळून जीवघेणा हल्ला करून जबरी चोरी केली. यामध्ये सूरज यांनी आरोपीला प्रतिकार केल्याने दोघेही जखमी झाले. या जखमी आरोपीला सुरज आणि ग्रामस्थांनी मिळून पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर दुसरा आरोपी अमोल पळून गेला. आरोपी अमोल याचा गावक-यांनी पाठलाग केला. मात्र, त्याने धूम ठोकली.

_MPC_DIR_MPU_II

स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना माहिती मिळाली की, आरोपी अमोल वाघोली येथे येणार आहे. त्यानुसार परिसरात सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हा गुन्हे केल्याचे कबूल केले.

आरोपी अमोल हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर निगडी पोलीस ठाण्यात तीन, चिंचवड, हडपसर, शिरूर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक आणि सातारा जिल्ह्यातील भुईंज पोलीस ठाण्यात एक दरोडा, दरोड्याची तयारी, चोरीचे गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी त्याला शिरूर पोलिसांकडे देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक जयंत मीना, उप विभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, सहाय्य्क पोलीस फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस कर्मचारी उमाकांत कुंजीर, सचिन गायकवाड, विजय कांचन, राजु मोमीन, जनार्दन शेळके, धिरज जाधव, बाळासाहेब खडके, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.