BNR-HDR-TOP-Mobile

Pune : महापालिका अधिकाऱ्याला एका भाजप नगरसेविकेच्या पतीकडून दमबाजी!

0

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला एका भाजप नगरसेविकेच्या पतीने दमबाजी केल्याची घटना मंगळवारी घडली. ‘याच’ नगरसेविकेच्या पतीने काही वर्षांपूर्वी एका माजी महापौरांचा फोनवर चांगलाच उद्धार केला होता.

मंगळवारी झालेल्या घटनेमुळे नगरसेविकेच्या पतींचा महापालिका कारभारात हस्तक्षेप वाढत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 टक्के आरक्षण लागू झाले आहे. पण, यातील बहुतांशी महिला नगरसेविका नावालाच असून त्यांचे पतीच कारभार पाहत असल्याचे चित्र पुणे महापालिकेत दिसून येते.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement