BNR-HDR-TOP-Mobile

Pune : नवनियुक्त आयुक्त शेखर गायकवाड यांनी स्वीकारला पदभार

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त म्हणून शेखर गायकवाड यांनी आज (बुधवारी) दुपारी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. सौरभ राव यांनी गायकवाड यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी अतिरिक्त आयुक्त रूबेल अग्रवाल, शंतनू गोयल, उपयुक्त राजेंद्र मुठे उपस्थित होते. सौरभ राव सुद्धा लवकरच साखर आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. पुणे महापालिकेचे 2020 – 21 चे अंदाजपत्रक नवीन आयुक्तच सादर करणार आहेत.

ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर, पुणेकरांचे चांगले सहकार्य मिळाले असून, समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केल्याचे सौरभ राव यांनी सांगितले.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like