BNR-HDR-TOP-Mobile

Pune : दीड वर्षाच्या नातवाला भेटू देत नाही म्हणून ज्येष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज – काही कारणामुळे माहेरी निघून गेलेली सून दीड वर्षाच्या नातवाला भेटू देत नाही या कारणामुळे एका ज्येष्ठ नागरिकाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी सतर्कता दाखवत त्याला वेळीच रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्या नागरिकाचे प्राण वाचले. पुण्यातील उत्तमनगर पोलिसांच्या हद्दीत सोमवारी (15 एप्रिल) ही घटना घडली. 
सुरेश माधवराव कुलकर्णी (शिवणे) असे या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. त्यांच्या मुलाचा एका तरुणीसोबत प्रेमविवाह झाला आहे. त्यांना दीड वर्षाचा मुलगाही आहे. काही कारणास्तव त्यांची सून मुलाला घेऊन माहेरी राहते. परंतु नातवावर जीव असलेल्या कुलकर्णी यांनी त्याला भेटण्यासाठी खूप प्रयत्न केले पण सुनेने त्याला भेटू दिले नाही.
  • या प्रकारामुळे आलेल्या नैराश्यातून कुलकर्णी यांनी सोमवारी झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आणि विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बेशुद्धावस्थेत ते जीलानी मस्जिदसमोर बेशुद्धावस्थेत पडले होते. रस्त्याने जाणाऱ्या एका नागरिकाने पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कुलकर्णी यांना रुग्णालयात दाखल केले आणि त्यांचे प्राण वाचवले.

Advertisement