Pune : सहा वर्षीय मुलीचा खून करून आई पोलीस ठाण्यात हजर

एमपीसी न्यूज – उच्चशिक्षीत आईनेच पोटच्या सहा वर्षाच्या मुलीच्या दोन्ही हातांच्या नसा चाकूने कापून तिचा खून केला. हा धक्कादायक प्रकार आज, सोमवारी दुपारी पर्वती परिसरातील तावरे कॉलनी येथे घडला.

अक्षरा अमित पाटील (वय सहा वर्षे) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. याप्रकरणी अक्षराची आई श्वेता अमित पाटील (वय 36, रा. अरविंद अपार्टमेंट, तावरे कॉलनी) हिला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली.

आरोपी श्वेताच्या पतीला अमेरिकेत नोकरी मिळाली. मात्र श्वेता हिला अमेरिकेला जायचे नव्हते. त्यावरून पती-पत्नीत वाद झाला. त्यानंतर मुलीसह घरातून निघून गेलेल्या श्वेता हिने आपल्या काकाच्या घरी जाऊन हे कृत्य केले. खून केल्यानंतर ती पोलीस ठाण्यात स्वतः हजर झाली. श्वेता पाटील ही मानसिक रुग्ण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.