Pune : पुणे महापालिकेसमोर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, एकाचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज : महापालिका भवनसमोर भरधाव ट्रकच्या (Pune) धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक पसार झाला होता. पसार झालेल्या ट्रक चालकाला शिवाजीनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून बेड्या ठोकल्या. ख्वाजामिया मस्तानमिया खान (वय 26, रा. बिदर, कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.

गेल्या महिन्यात २२ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अपघाताची घटना घडली होती. या भरधाव ट्रकने एका दुचाकीला धडक दिली होती. त्यात दुचाकीस्वार पृथ्वीराज विष्णुकुमार शेळके (वय २२, पिंपरी) याचा मृत्यू झाला होता.

Pune Crime : रिक्षाचा धक्का लागल्याने रिक्षा चालकाचा खून

पण, अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला होता. ट्रकचा क्रमांक देखील मिळालेला नव्हता. पोलिसांनी महापालिका भवन परिसरातील सीसीटीव्ही तपासले. तेव्हा अपघातानंतर ट्रकचालक गाडगीळ पुतळा परिसरातून कुंभारवेस चौकातून मालधक्का परिसरात गेल्याचे आढळून आले.

पोलिसांचे पथक तेथे पोहोचले. तेव्हा ट्रकचालक हैद्राबादला (Pune) गेल्याचे समजले. दरम्यान, माहिती घेत असताना तो हैद्राबादहून परत पुण्याकडे निघाला असून मालधक्का भागात येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने ट्रकचालक खानला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अपघाताची कबुली दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.