Pune: सिंहगड रस्त्यावरील मावळ्यांची शिवजन्मभूमी शिवनेरीवर अभ्यास सहल

एमपीसी न्यूज – मृत्युंजय अमावस्या विचार मंच व शिवसमर्थ प्रतिष्ठानतर्फे अयोजित किल्ले स्पर्धेतील सहभागी स्पर्धकांची अभ्यास सहल किल्ले शिवनेरीवर आयोजित करण्यात आली होती. लहान मुलांपासून ते तरुणांपर्यत या सहलीत शिवभक्तांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकूण 850 जण या सहलीमध्ये सहभागी झाले होते.

किल्ले स्पर्धेतील विजेत्यांना कोणतेही रोख रक्कम बक्षीस म्हणून न देता, त्यांना एखाद्या किल्ल्यावर घेऊन जाऊन त्यांच्यामध्ये शिवभक्ती रुजवण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असे नगरसेविका मंजुषा नागपुरे म्हणाल्या. शिवनेरी किल्ल्यावरच किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ घेण्यात आला. या कार्यक्रमास इतिहास संशोधक प्रा.डॉ.प्रमोद बोराडे मुलांना मार्गदर्शन करण्यास उपस्थित होते.

शिवनेरी किल्ल्याची सखोल माहिती व दुर्गांचे मराठा इतिहासातील महत्व त्यांनी समजावून सांगितले. सहलीची औपचारिक सुरुवात करून देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, आमदार व पुणे शहर भाजपा अध्यक्षा माधुरी मिसाळ, पुणे शहर सरचिटणीस राजेश पांडे, सिंहगड भाग कार्यवाह सचिन भोसले, माजी नगरसेवक उज्जवल केसकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मंजुषा नागपुरे, दीपक नागपुरे, निलेश भिसे यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.