Pune : बारामतीतील उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा वाहनचालक एसीबीच्या जाळयात!

पुणे लाच लुचपत विभागाची कारवाई; तक्रारदाराकडून घेतली बारा हजाराची लाच

एमपीसी न्यूज – बारामतीच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या वाहनचालकाला तक्रारदाराकडून सुमारे बारा हजाराची लाच घेताना पुणे लाच लुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. लक्ष्मण दादू झगडे (वय 57, सहायक पोलिस उप निरीक्षक, मोटार परिवहन विभाग, पुणे ग्रामीण, सध्या नेमणूक, उप विभागीय पोलीस अधिकारी बारामती यांचे वाहनावर चालक, रा. मु. पो. ता.इंदापूर, जि पुणे.) असे लाचखोर वाहनचालकाचे नाव आहे. याबाबत 39 वर्षे पुरुष तक्रारदाराने पुणे लाच लुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

याबाबत मिळालेली माहिती अशी, तक्रारदार याच्याविरुद्ध यापूर्वी भिगवण पोलिस स्टेशन येथे अवैध चंदन लाकूड चोरी आणि वाहतुकी संबंधित गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यांमध्ये कोर्टात केस चालवणे कामी मदत करणे आणि यापुढे हद्दीत पुन्हा चंदन लाकूड वाहतुकीस मदत करणे, यासाठी दिनांक 16 मे 2019 रोजी बारा हजार रुपयांची लाचेची मागणी लक्ष्मण झगडे यांनी तक्रारदार यांच्याकडे केली.

  • तसेच हि लाच उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालायाजवळील, उसाच्या रसाच्या दुकानाजवळ आज (मंगळवारी, दि. 21 मे 2019 रोजी) स्वीकारली. यावेळी पुणे लाच लुचपत विभागाने लक्ष्मण दादू झगडे यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

हि कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणेचे अप्पर पोलीस अधीक्षक दिलीप बोरस्ते, दत्तात्रेय भापकर पोलीस उपअधीक्षक, प्रतिभा शेंडगे पोलीस उप अधीक्षक, पोलीस हवालदार मुस्ताक खान, पोलीस नाईक कुंभार, पोलीस शिपाई सुप्रिया कादबाने, पोलीस शिपाई अंकुश आंबेकर, पोलीस शिपाई अभिजित राऊत आदींनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.