Pune : शहरातील झोपडपट्टी परिसरात महापालिकेतर्फे सर्वेक्षण

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या 15 क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या झोपडपट्टीतील नागरिकांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणाच्या कामाकरिता घरोघरीं येणाऱ्या मनपा सेवकांना नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पुणे महापालिका प्रशासनाचे वतीने करण्यात आले आहे.

सद्यस्थितीमधील कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधत्मक उपाययोजनेतर्गत हे सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामध्ये झोपडपट्टीधारकाचे नांव, कुटुंबातील एकूण सदस्य संख्या, बाहेरगावाहून अथवा परदेशातून आलेल्या सदस्यांची संख्या, परदेशातून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची संख्या, परदेशातून आलेल्या व्यक्तींकडे, सदनिका धारकाकडे कामकाज करीत असलेल्यांची संख्या, कुटुंबात कोणास सर्दी, ताप, खोकला, कफ, आजार आहेत काय?, अशा प्रकारची माहिती संकलित करण्यात येणार आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधत्मक माहिती देऊन जनजागृतीही करण्यात येत आहे.

नागरिकांनी कृपया सर्वेक्षण कामाकरिता सहकार्य करावे, असे मनपा प्रशासनाचे वतीने आवाहन करण्यात आले आहे. शहरात सर्वेक्षणकरिता मनपाच्या विविध विभागातील कर्मचार्याबरोबरच नर्सेस, समूहसंघटिका, आशा सेविका, लेखनिक, शिक्षणमंडळाकडील कर्मचारी यांचा सर्वेक्षणाकरिता सहभाग आहे. त्यांच्याकडे ओळखपत्रे आहेत.

सर्वेक्षणा अंतर्गत माहिती घेताना परदेश प्रवास करून आलेल्या व्यक्ती, आजाराची लक्षणे, मनपा दवाखान्यात संपर्क साधने अथवा डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात संपर्क व उपचार याबाबतची माहिती व जनजागृतीसाठी हे सर्वेक्षणाअंतर्गत कामे केली जाणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.