Pune : चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणारे चोरटे गजाआड; गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – फलकेमळा कारेगाव येथे कामगाराला चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या चारपैकी दोघांना गुन्हे अन्वेषण विभाग पुणे ग्रामीण पथकाने गजाआड केले. याबाबत अक्षय गजानन रणसिंग (वय 26 वर्षे, रा.निमगाव म्हाळुंगे, ता.शिरूर, जि.पुणे) यांनी रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात दि 13/11/2019 रोजी फिर्याद दिली होती.

त्यानुसार चार अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल केला होता. त्यातील शैलेशकुमार रामतीर्थ चौरासीया (वय 22 वर्ष, रा.सुबाखरपुर,आंबेडरकनगर, राज्य- उत्तरप्रदेश), रामकृश्ण अंकुष पात्रे, (वय 36 वर्षे रा. बोती ता.गंगाखेड जि. परभणी) या दोघांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, फिर्यादी अक्षय गजानन रणसिंग हे दि.12/11/2019 रोजी रात्री 21.30 वाजण्याचे सुमारास त्यांचे हिरो हेांडा मोटरसायकल (एम एच 14 ए पी 8426) वरून कारेगाव गावचे हददीत शंकर नवले यांचे गोडाऊनच्या समोरील एमआयडीसीकडे जाणारे रोडने जात होते. यावेळी फिर्यादीला चार अनोळखी इसमांनी अडवून त्यांचेकडील मोटरसायकल, रोख रक्कम व एक विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण 25,450/- रू.माल जबरी चोरी करून चोरून नेला.

याबाबत फिर्यादीने रांजणगाव एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार,. पोलिसांचा समांतर तपास सुरु होता. यावेळी मिळालेल्या खबऱ्याच्या माहितीनुसार पोलिसांनी शैलेशकुमार रामतीर्थ चौरासीया आणि रामकृश्ण अंकुष पात्रे या दोघांना रांजणगाव एमआयडीसी आणि न्हावरा येथून ताब्यात घेतले असून त्यांच्या साथीदारांचा शोध पोलीस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.