Pune : शहरासह जिल्ह्यात ‘कोरोना’बाधितचे एकूण 71 रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच असून आज 11 रुग्ण वाढून ही संख्या आता 71 झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली. यात पुणे शहरात आणखी ८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून चार रुग्ण शहर हद्दीतील तर एक रुग्ण ग्रामीण भागातील आहे.

वाढत असलेले रुग्णांची आकडेवारी ही पुणेकरांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यापूर्वी कोरोनामुळे पुण्यात 2 रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवसांचा लोकडाऊन जाहीर केल्यानंतर पुण्यातील रस्त्यांवर शुकशुकाट आहे. कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत पुणेकरांनी घरातच राहण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी रेशन, भाजीपाला, औषधे उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मजुरांचे वाढते स्थलांतर रोखून त्यांची व्यवस्था राहण्याची, जेवणाची व्यवस्था महापालिकेच्या शाळांत करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like