Pune : लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकाचा खोल दरीत पडून मृत्यू

एमपीसी न्यूज : रायगड जिल्ह्यातील लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी (Pune) गेलेल्या एका पर्यटकांचा खोल दरीत कोसळल्याने मृत्यू झाला. सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. अजय काळे (वय 62, रा. पनवेल) असं मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकाचे नाव आहे. मुंबईतील एका ट्रेकिंग करणाऱ्या ग्रुपसोबत तो लिंगाणा किल्ल्यावर आला होता.

याप्रकरणी स्थानिक नागरिकांकडून मिळालेली माहिती अशी की, मुंबईहून ट्रेकिंगसाठी काही नागरिकांचा ग्रुप सोमवारी सकाळी लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी आला होता. यातील जेष्ठ ट्रेकर अजय काळे हे अनुभवी होते. दरम्यान ट्रेकिंग करत असताना अचानक चक्कर येऊन ते खोल दरीत कोसळले. जवळपास 400 फूट खोल दरी असल्याने मदतकार्य त्यांच्यापर्यंत पोहोचली नाही.

दरम्यान पर्यटक कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर वेल्हे तालुक्यातील पासली येथील काही ग्रामस्थांनी आणि आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी लिंगाणा किल्ल्याच्या पायथ्याशी धाव घेतली. यावेळी त्यांनी पाहणी केली असता पर्यटक कोसळलेल्या ठिकाणी जाण्यासाठी जवळपास तीन तासाहून अधिक कालावधी लागत होता.

त्या ठिकाणी जाण्यासाठी अनुभवी ट्रेकर आणि दोरखंडाची आवश्यकता होती. त्यामुळे (Pune) रात्री उशिरापर्यंत त्या ठिकाणी कोणीही पोहोचू शकले नव्हते.

Hadapsar Crime : पुण्यात चार वर्षीय चिमुरडीचा सख्ख्या आईनेच चाकूने भोसकून केला खून

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.