Pune : पुणे रेल्वे जंक्शन यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या डब्ब्याला भीषण आग

एमपीसी न्यूज – पुणे स्थानकात यार्डमध्ये उभ्या असलेल्या (Pune)  रेल्वेच्या एका डब्ब्याला रात्री 2 च्या सुमारास भीषण आग लागली. ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळी जात आगीवर नियंत्रण मिळवले.

पुणे रेल्वे स्थानकात क्वीन्स गार्डनच्या शेजारी यार्डमध्ये उभ्या असलेल्या रेल्वेच्या स्लिपर कोचच्या डब्ब्याला मध्यरात्री भीषण आग लागली.  ही आग एवढी भीषण होती की, आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात हवेत होते. या घटनेमुळे रेल्वे प्रशासानाची मोठी धावपळ उडाली. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला देण्यात आली.

Pimpri : उत्तम आरोग्यासाठी व्यायाम व आहाराकडे लक्ष देण्याची आवश्यकता –  डॉ.कांचन दुरुगकर

अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी रवाना झाले. त्यांना बऱ्याच दिवसांपासून स्थानकात उभ्या असलेल्या रेल्वेच्या एका डब्ब्याला मोठी आग लागल्याचे निदर्शनास आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने आग विझवण्यास सुरुवात केली. या घटनेत रेल्वेचे आणखी दोन डब्बे जळाले.

सुमारे तासाभरानंतर ही आग विझवण्यात अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना यश आले. या घटनेत सुदैवाने  जीवित हानी झाली नाही. ही आग नेमकी कशी लागली हे समजू शकले नाही. रेल्वे अधिकारी या घटनेचा तपास करत (Pune) आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.