Pune : मनसैनिकांचे पोटाला ट्यूब बांधून आणि क्रिकेट खेळत अनोखे आंदोलन

एमपीसी न्यूज : पुणे शहरातील शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात पुणे महापालिकेच्या (Pune) माध्यमातून दळवी हॉस्पिटल जवळील आमदार शिवाजीराव भोसले आणि औंध भागातील महाराज सयाजीराव गायकवाड भवन हे दोन जलतरण तलाव लवकरात लवकर सुरू करण्यात यावे. या मागणीसाठी आज मनसेचे नेते रणजीत शिरोळे आणि शिवाजीनगर विधानसभा अध्यक्ष विनायक कोतकर यांच्या नेतृत्वाखाली जलतरण तलाव परिसरात मनसे कार्यकर्त्यांनी पोटाला ट्यूब बांधून तसेच क्रिकेट खेळत आंदोलन केले.

महिला विभाग अध्यक्ष जयश्री मोरे, जना रणदिवे, निलेश जुनवणे, अनिकेत मुरकुटे, अमर आढाळगे, मयूर बोलाडे, जितेंद्र कांबळे, अनिल व्हाटकर, सुनील लॉयरे, चेतन धोत्रे, करण सुरवसे, निलेश रणदिवे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

India News : बनावट कागदपत्रांच्या आधारे खरेदी केलेली 30 हजार सिमकार्ड बंद

यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजीत शिरोळे म्हणाले की, शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात पुणे महापालिकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्चून मागील आठ वर्षापूर्वी दळवी हॉस्पिटल जवळील आमदार शिवाजीराव भोसले आणि औध भागातील महाराज सयाजीराव गायकवाड भवन हे दोन जलतरण तलाव बांधले आहे.

पण, हे दोन्ही तलाव तेव्हापासून आजअखेर बंद ठेवण्यात आले असून दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी मोठ्या (Pune) प्रमाणावर झाडी वाढली असून दारूच्या बाटल्या आहे. त्यामुळे ही अवस्था लक्षात घेता, आता महापालिका प्रशासनाने आमच्या आंदोलनाची दखल घेऊन येत्या 15 दिवसात जलतरण तलाव नागरिकाच्या सेवेत उपलब्ध करून न दिल्यास मनसे स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा महापालिका प्रशासनाला त्यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.