Pune : मोमीनपुरा येथील आगीत एका कामगाराचा मृत्यू, तीन दुकाने जळून खाक

एमपीसी न्यूज – पुण्यातील मोमीनपुरा येथील बेस्ट बेकरीमधील आतील रूममध्ये शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत बेकरीसह तीन दुकाने जळून खाक झाली आहेत.

या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.  यात विनोद सरोज असे मृत्यू झाल्याचे नाव असून असलम शेख गंभीर जखमी झाल्याचे नाव आहे.

अग्निशामक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोमीनपुरा येथील बेस्ट बेकरीमध्ये पाच वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतर काही मिनिटात घटनास्थळी पोहोचल्यानंतर काही क्षणात आगीवर नियंत्रण मिळविता आले. या आगीत बेकरी आणि एसी दुरुस्तीच्या दुकानाचाचा काही भाग जळला. तर कुशन आणि टेलरचा कारखाना पूर्णपणे जळून खाक झाला.

या घटनेत दोन कामगार गंभीर जखमी झाले असून त्या दोघांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दोघांमधील एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तसेच ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.