Pune: धायरी परिसरात तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

Pune: a young girl committed suicide in dhayari area दुपारी आई घरी परत आली असता दरवाजा आतून बंद होता. त्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

एमपीसी न्यूज- सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरात एका 22 वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाी आहे. कोमल महादेव बांदल (रा.शौर्य व्हिला, पोकळे वस्ती, धायरी, ता. हवेली, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास उघडीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल बारावीपर्यंत शिकली असून ती सध्या घरीच असते. तिचे वडील व भाऊ खासगी कंपनीत कामास आहेत. मंगळवारी सकाळी भाऊ व वडील कामाला गेले होते. तर तिची आई सकाळी अकराच्या दरम्यान दवाखान्यात गेली होती.

त्यावेळी कोमल घरी एकटी होती. दुपारी आई घरी परत आली असता दरवाजा आतून बंद होता. त्यांनी दरवाजा ठोठावला असता आतून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही.

त्यानंतर शेजारच्या गॅलरीतून एकाला आत उतरवून आतील कडी काढण्यात आली. त्यावेळी हॉलमधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेतल्याचे निर्दशनास आले. सिंहगड रस्ता पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.