Pune : किरकोळ वादामधून इमारतीच्या छतावर कोयत्याने वार करीत तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – किरकोळ वादामधून तरुणावर कोयत्याने वार करीत ( Pune) खून करण्यात आला. ही घटना गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री घडली.

सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघा जणांना (आरोपींची नावे अद्याप समजू शकली नाहीत)   ताब्यात घेतले आहे.

Pune : पुण्यातील बाणेर परिसरात तरुणांवर गोळीबार;हल्ल्यात एक तरुण जखमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सिद्धार्थ हादगे आणि आरोपींचे वाद झाले होते. आरोपी कोयते घेऊन त्याच्या मागे लागले. तो ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला असता आरोपींनी त्याला एकटे गाठत वार करून खून केला.

पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी खुनाचा प्रकार घडला आहे.पुढील तपास पोलीस करत ( Pune) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.