Pune : ट्रक खाली सापडून तरुणीचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज- बोअरवेल ट्रकखाली सापडल्याने दुचाकीवरील तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना वाघोली-केसनंद रोडवरील नायरा पेट्रोल पंपासमोर गुरुवारी दुपारी एकच्या (Pune) सुमारास घडली. दुचाकीवरील तरुणही जखमी झाला आहे.

गौरवी रवींद्र जाधव ( वय 19,सध्या रा. गुलमोहर सोसायटी,वाघोली, मुळगाव – कोल्हापूर) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे.या प्रकरणी आशिषकुमार याने पोलिसात फिर्याद दिली असून ट्रक चालक लक्षुमन चीन्नास्वामी ( वय 39, सध्या रा कोलवडी, ता हवेली ) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, आशिषकुमार व गौरवी हे दोघे दुचाकींवर जात असताना ट्रकचा दुचाकीला धक्का लागल्याने ते दोघे खाली पडले.गौरवी त्याच ट्रकच्या मागील चाकाखाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर आशिषकुमार हा जखमी झाला.   पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव लिंगे करीत (Pune)आहेत.

Talegaon Dabhade : इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या तीनही शाळांचा निकाल 100 टक्के

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.