Pune : देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुस बाळगणाऱ्या युवकाला अटक

एमपीसी न्यूज-देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतुस बाळगणाऱ्या युवकाला  (Pune ) गुन्हे शाखेने सिंहगड रस्ता परिसरात पकडले. त्याच्याकडून पिस्तूल व एक काडतुस जप्त करण्यात आले.

ऋषीकेश लक्ष्मण शिंदे (वय 19, रा. साईनगर, हिंगणे खुर्द, सिंहगड रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

Chakan : जमीन विक्रीत चांगला मोबदला देण्याच्या बहाण्याने 65 लाखांची फसवणूक

सिंहगड रस्ता परिसरात थांबलेल्या एका तरुणाकडे  पिस्तूल असल्याची माहिती पोलीस कर्मचारी श्रीकांत दगडे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून शिंदेला पकडले. त्याच्याकडून पिस्तूल, एक काडतुस आणि एक मॅगझीन जप्त करण्यात आले.

चौकशीत शिंदेने धायरीतील मित्र ओंकार लोहकरे याच्याकडून पिस्तूल विकत घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी लोहकरे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. शिंदेने पिस्तूल कशासाठी बाळगले होते, याचा तपास करण्यात येत आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, नरेंद्र पाटील, श्रीकांत दगडे, महेश पाटील, रवींद्र लोखंडे, बाळू गायकवाड, नारायण बनकर आदींनी ही कारवाई (Pune ) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.