Pune : स्वारगेट बस स्टँड परिसरात तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज-पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एका तरुणावर ( Pune ) कोयत्याने वार करण्यात आले. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. समीर हेमंत कांबळे (वय 28) या तरुणाने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार चार जणांवर स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

तन्मय श्रावण शेडगे (वय 25), गौरव साळुंखे (वय 24) मयूर आणि एका अनोळखी इसमे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 31 मे च्या पहाटे स्वारगेट बस स्टँडच्या इन गेट जवळ हा प्रकार घडला.

 

SSC Result : दहावीत 31 पैकी 13 विषयांचा निकाल 100 टक्के

 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे त्यांच्या रिक्षात बसले होते. यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरून फिर्यादीला रिक्षाच्या बाहेर ओढले. तुला खूप माज आला आहे आज तुला बघतोस आज तुला सोडणार नाही, असे म्हणून शिवीगाळ केली आणि आरोपी तन्मय शेळके यांनी हातातील कोयत्याने फिर्यादीवर वार केले. तसेच फिर्यादीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करत तिथे उभ्या असलेल्या खाजगी ट्रॅव्हल बसची तोडफोड केली. स्वारगेट पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू ( Pune ) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.