Pune : मेगाभरतीसाठी ‘आप’ युवा आघाडीतर्फ़े मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची प्रतिकात्मक महाआरती

मुख्यमंत्र्याच्या नावाने महाआरती 

एमपीसी न्यूज – देवेंद्र फडणवीस सरकारने मेगाभरतीची प्रक्रिया जलद करावी आणि युवकांच्या रोजगाराचा प्रश्न लवकर मार्गी लावावा, या मागणी करीता आम आदमी पार्टी युवा आघाडीने जोरदार घोषणाबाजी करून आंदोलन केले. ‘मेगाभरती लवकर व्हावी यासाठी महाआरती करून बालगंधर्व चौकात मुख्यमंत्र्यांच्या पोस्टरची प्रतिकात्मक महाआरती करण्यात आली.  तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पोस्टरला गाजराचा हार घालून जाहीर निषेध नोंदवण्यात आला. 

‘आप’ युवा आघाडी सातत्याने युवकांच्या रोजगाराप्रश्नी आवाज उठवत आहे. सरकारने 72 हजार जागांची मेगाभरती जाहीर केली. मराठा आरक्षणा संबंधित याचिकेवर सुनावणी करताना माननीय न्यायालयाने 23 जानेवारी पर्यंत मेगाभरती मधील नियुक्ती पत्रे देऊ नयेत, असा आदेश देण्यात आला आहे. यानंतर देखील नियुक्ती होईल का ? याबाबतची शंका स्पर्धा परीक्षार्थींकडून उपस्थित केली जात आहे.

या प्रसंगी एमपीसी न्यूजशी बोलताना ‘आप’ युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे म्हणाले कि , मेगाभरती ‘ संबंधी न्यायालयाच्या निर्णयाचे कारण पुढे करून सरकार या  प्रक्रियेस अजून विलंब करेन , आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भरतीचे आश्वासन देऊन त्याचा वापर करेन . परीक्षा देऊन नियुक्त्याच नाहीत अशी अवस्था युवक-युवतींची होणार आहे. बीएमसी आणि सिडकोच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. यावरून सरकारमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे . मेगाभरतीचे मोठं गाजर या सरकारने दिलं आहे. आणि त्यामुळेच आम्ही आज त्याच गाजराचा हार मुख्यमंत्रांच्या पोस्टरला घालून याठिकाणी निषेध व्यक्त केला आहे.

शासनाने आचारसंहिता  लागण्यापूर्वी मेगाभरतीचा कार्यक्रम जाहीर करावा आणि लाखो युवकांच्या मनातला संभ्रम दूर करावा अशी मागणी आम आदमी पार्टी युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली.या आंदोलनात आम आदमी पार्टी आघाडी प्रमुख मुकुंद किर्दत, डॉ. अभिजीत मोरे, ‘आप’ युवा आघाडी पुणे जिल्हा संयोजक चेतन बेंद्रे, श्रीकांत आचार्य, प्राजक्ता देशमुख, संदीप सोनावणे, प्रीती गुर्जर, स्वप्नील घिया, सावन राऊत, निखिल खळे, योगेश इंगळे, योगेश कापसे, आशुतोष शिपलकर, ताहेर पटेल, महेश जगताप, अभिजीत गोसावी, उत्तम पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.