Pune : भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड तर्फे ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती; लष्करातील 300 हून अधिक अधिकारी व जवानांची उपस्थिती

एमपीसी न्यूज : : भारत माता की जयच्या (Pune) घोषणा देत सीमेवर 24 तास खडा पहारा देणा-या भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड मधील 300 हून अधिक अधिकारी व जवानांनी ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती केली. भारतीय लष्कराच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या सदर्न कमांड (दक्षिणी मुख्यालय) मधील 330 कमांडचे जवान ‘दगडूशेठ’ गणपती चरणी नतमस्तक झाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्या वतीने ट्रस्टच्या 131 व्या वर्षी गणेशोत्सवात जवानांचे स्वागत करण्यात आले. यावेळी लेफ्टनंट जनरल ए.के.सिंग, मेजर जनरल, ब्रिगेडियर, कर्नल, मेजर, कॅप्टन, सुभेदार यांसह लष्करातील वरिष्ठ अधिका-यांच्या हस्ते आरती झाली.

Pune : धनगर समाज आरक्षण; मुख्यमंत्र्यांनी एवढी सकारत्मकता दाखवल्यावर निश्चित मार्ग निघेल – देवेंद्र फडणवीस

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुनील रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सरचिटणीस अमोल केदारी, राजाभाऊ पायमोडे, इंद्रजीत रायकर, माऊली रासने, राजू आखाडे, अमोल चव्हाण आदी उपस्थित होते.

पुण्यात असलेल्या  24 मराठा बटालियन, 15 जाट बटालियन आणि 1 महार बटालियन चे जवान व कुटुंबीय यावेळी सहभागी झाले होते. गणपती बाप्पा मोरया…च्या जयघोषाने (Pune) संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यावेळी सदर्न कमांड तर्फे ट्रस्टला सन्मानचिन्ह देखील देण्यात आले.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share