BNR-HDR-TOP-Mobile

Pune : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदक पटकावल्याबद्दल आरुष डोळसचा सत्कार

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – टर्की- अंताल्या येथे पार पडलेल्या सात वर्षाखालील शालेय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत सांगवी येथील आरुष डोळस याने लक्षवेधी कामगिरी करत सुवर्णपदक पटकावल्यामुळे जयंत गोखले चेस इंस्टिट्यूटच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी पुण्यात आयोजित बुद्धिबळ महोत्सवात आरुषचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव राजेंद्र कोंडे व ग्रॅंडमास्टर अभिमन्यू पुराणीक,डॉ बबन डोळस, जयंत गोखले आदी उपस्थित होते.

  • या स्पर्धेत सातवे मानांकन असलेल्या आरुषने ९ सामन्यांमध्ये ८ गुणांसह सुवर्णपदकाची कमाई केली.आरुषने आपली ७ सामन्यांमध्ये आपली विजयी मालिका कायम ठेवत रशिया, टर्की, इंग्लंड, जैर्जिया, कझाकिस्तान, अझरबैजान येथील खेळाडूवर सनसनाटी विजय मिळवला.

अंतिम फेरीत आरुषने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर ४ तास आणि ८३ चालीपर्यंत रंगलेल्या डावात विजय मिळवत त्याने अर्ध्या गुणाच्या फरकाने आपल्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

HB_POST_END_FTR-A2

.