Pune : आबा बागुल यांनी स्वीकारला काँग्रेस गटनेते पदाचा पदभार

Aba Bagul accepted the post of Congress group leader

एमपीसी न्यूज – काँग्रेसमध्ये आता ‘नवा गडी नवे राज्य ‘ सुरू झाले आहे. पुणे महापालिकेच्या काँग्रेस गटनेते पदाचा पदभार मंगळवारी आबा बागुल यांनी स्वीकारला. महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आज दुपारी गटनेते पदाचे पत्र आबा बागुल यांना दिले. त्यानंतर बागुल यांनी काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा केली.

भाजप विरोधात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे शहरातही पदाधिकारी बदलण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार जेष्ठ नगरसेवक आबा बागुल यांना गटनेते पदावर काम करण्याची संधी देण्यात आली आहे. यापूर्वीचे गटनेते अरविंद शिंदे यांना काही महिन्यांपूर्वीच राजीनामा द्यायला सांगितले होते.

कोरोनाच्या संकटामुळे गटनेते पदाची नियुक्ती रखडली होती. बागुल हे मागील 30 वर्षांपासून नगरसेवक आहेत. त्यांना स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर, विरोधी पक्ष नेता, गटनेते पदाचा काम करण्याचा अनुभव आहे. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी बागुल यांची निवड महत्वपूर्ण मानली जात आहे.

पुणे शहरात सोमवारी पेट्रोल – डिझेल दरवाढी विरोधात स्वतः प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. पुणे शहरात आगामी काळात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आणखी नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात येणार असल्याची कुजबुज पक्षात सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.