Pune : होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी अब्दुल फकी याला अटक

0 709

एमपीसी न्यूज- पुण्यात घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या कॅप्शन या होर्डिंग कंपनीचा मालक अब्दुल फकी याला मंगळवारी (दि.9) ला रात्री पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या अगोदर अटक करण्यात आलेले पांडुरंग वनारे हा रेल्वेमध्ये लोहार म्हणून कार्यरत आहे तर संजय सिंग हा रेल्वेमध्ये सेक्शन इंजिनिअर म्हणून काम करतो. पुण्यातील जुना बाजार येथील रेल्वेच्या अखत्यारित येणारा होर्डिंगचा सांगडा अंगावर पडल्याने शुक्रवारी (दि.5) चार जणांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. 

HB_POST_END_FTR-A2
%d bloggers like this: