Pune : आबेदा इनामदार सिनियर कॉलेजला ‘नॅक अ‍ॅक्रिडिटेशन’

एमपीसी न्यूज- ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘आबेदा इनामदार सिनियर कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स अँड कॉमर्स’ ला ‘नॅशनल असेसमेंट अँड अ‍ॅक्रिडिटेशन’ (बंगळुरु) ने ‘नॅक अ‍ॅक्रिडिटेशन’ दिले आहे.

‘ए’ श्रेणी देखील मिळाली आहे. 30 व्या मान्यताप्राप्त स्थायी समितीने 03 जुलै 2018 रोजी संस्थेला भेट देऊन पाहणी, तपासणी केली होती.

या मूल्यांकनाबद्दल एम. सी ई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी . ए. इनामदार आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बुटवाला यांनी सर्व टीम चे अभिनंदन केले.
यात अभ्यासक्रम, शिक्षण आणि मूल्यांकन, संशोधन, नवकल्पना आणि विस्तार, पायाभूत सुविधा आणि शिक्षण संसाधने, विद्यार्थी आणि प्रगती, नेतृत्व आणि व्यवस्थापन, संस्थात्मक मूल्य या निकषांच्या आधारे हे अ‍ॅक्रिडिटेशन’ देण्यात आले आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शैला बुटवाला यांनी पत्रकाद्वारे दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.