Pune : शालेय गटात अभिनवला दुहेरी मुकुटाची संधी; सृजन करंडक 2019 आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धा

एमपीसी न्यूज – सृजन करंडक २०१९ आंतरशालेय बास्केटबॉल स्पर्धेत अभिनव विद्यालय संघाने मुले आणि मुलींच्या गटात अंतिम फेरी गाठताना दुहेरी विजेतेपदाची संधी निर्माण केली आहे.

महाविद्यालयीन गटात स.प. आणि महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), लोणी संघांनी मुलींच्या, तर नेस वाडिया आणि इंदिरा महाविद्यालय संघांनी मुलांच्या गटातून अंतिम फेरी गाठली.

डेक्कन जिमखना क्लबच्या कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत महविद्यालयीन गटाच्या उपांत्य फेरीत मुलींच्या गटात स. प. महाविद्यालयाने गरवारे महाविद्यालयाचा 54-31 असा पराभव केला. आक्रमक सुरवात करतना त्यांनी मध्यंतरालाच 25-11 अशी आघाडी घेत सामनयाचा निकाल जवळपास निश्चित केला होता. स.प.कडन रुपाली त्रिपाठीने 10, तर सिद्धि कोठावळे हिने 8 गुणांची नांद केली. त्यांना श्रुती शेरीगरची साथ मिळाली. गरवारेकडून ओशिन जिनकर हीची लढत अपयशी ठरली.

दुसऱ्या उपांत्य लढती एमआयटी, लोणी संघाने भारतीय विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा 33-6 असा धुव्वा उडवला. निचांकी गुणांच्या या सामन्यात एमआयटीने मध्यंतराला 19-4 अशी आघाडी घेत वर्चस्व राखले होतो. ते उत्तरार्धात कमी होऊ न देता त्यांनी सहज विजय मिळविला. विजयी संघाकडून इशा घारपुरे हिने 12, तर हर्मिता चंदावत हिने 7 गुण नोंदविले.

मुलांच्या गटात नेस वाडियाने बीएमसीसीचा 70-57, तर इंदिरा महाविद्यालयाने एमआयटीचा 41-24 असा पराभव केला. आंतरशालेय गटात अभिनव प्रशला संघाने एसपीएमचा 35-30 आणि डीएव्ही प्रशालेचा 57-34, तर मुलींच्या गटात सरदार दस्तूर प्रशाला संघांशी गाठ पडणार आहे.

निकाल : महाविद्यालयीन गट (उपांत्य फेरी)
मुली :- महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणी (एमआयटी) 33 (इशा घारपुरे 12, हर्मिता चंदावत 7) वि.वि. भारतीय विद्यापीठाचे अमभियांत्रिकी महाविद्याय 6 (दीपा गोडसे 3) मध्यंतर 19-4

स.प.महाविद्यालय 54 (सिद्धी कोठावळे 8, श्रुती शेरीगर 8, रुपीलू त्रिपाठी 10) वि. वि. गरवारे कॉलेज 31 (ओशिन जिनीकर 11) मध्यंतर 25-11

मुले :- नेस वाडिया 70 (युसूफ सय्यद 38, आशिष पवार 24) वि.वि. बीएमसीसी 57 (रिषि शुक्ला 31, गुरप्रताप धिंड 8) मध्यंतरा 34-23
इंदिरा कॉलेज 41 (आशिष जेना 17, यश पगारे 14) वि.वि. एमआयटी 24 (जयेश काताडे 8, ध्रुव धोर्मी 7) मध्यंतर 22-13

आंतरशालेय गट मुली :-
अभिनव विद्यालय 35 (सानवी घोलप 10) वि.वि. एसपीएम 30 (आर्या घाटे 12) मध्यंतर 14-14
सरदार दस्तूर प्रशाला 30 (तन्वी साळवे 9, भूमिका सर्जे 6) वि.वि. सेंट जोसोप स्कूल 8 (निनारिका जॉर्ज 5) मध्यंतर 12-5

मुले :- मिलेनियन स्कूल 43 (आर्यराज भन्साले 17, अथर्व कुभांरे 9) वि.वि. विद्याभवन स्कूल 34 (शिवराज पटेल 21) मध्यंतर 24-22
अभिनव विद्यालय 57 (आदी जगदाळे 22) वि.वि. डी.ए.व्ही. स्कूल 34 (कुणाल भोसले 22) मध्यंतर 26-25.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like