Pune: नीलम गोऱ्हे यांच्या प्रयत्नाला यश, पॅरिसमध्ये अडकलेले अभिषेक आदक भारतात सुखरूप परत

Pune: Abhishek Adak stranded in Paris returns safely to India because of help of mlc neelam gorhe कोरोनाच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व विमाने रद्द करण्यात आली आहेत. लॉकडाऊन आणखी किती दिवस असेल याची कल्पना कोणालाच नव्हती.

0

एमपीसी न्यूज- कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन काळात पॅरिसमध्ये अडकून पडलेले अभिषेक अशोक आदक भारतात सुखरूप परत आले. त्यांना भारतात आणण्यासाठी आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मोलाची मदत केली.

कोरोनाच्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व विमाने रद्द करण्यात आली आहेत. लॉकडाऊन आणखी किती दिवस असेल याची कल्पना कोणालाच नव्हती. त्यामुळे अभिषेक यांच्या वडिलांनी नवी मुंबईतील अशोकानंद जवळगावकर यांच्यामार्फत डॉ. नीलम गोऱ्हे यांना संपर्क साधला.

नीलम गोऱ्हे यांनी तात्काळ संबंधित विभागांना सूचना दिल्या. त्यांच्या कार्यालयाने भारतीय दुतावासास संपर्क साधला. डॉ. गोऱ्हे यांच्या तात्काळ प्रयत्नांनी अभिषेक आदक दिनांक १६ जून २०२० रोजी भारत सरकारच्या ‘वंदे भारत’च्या विशेष विमानाने नवी दिल्ली येथे आले.

नवी दिल्लीमध्ये शासनाच्या सूचनेनुसार ७ दिवस संस्थात्मक विलगिकरणामध्ये राहिले. रविवारी ते पुणे येथे घरी पोहोचले. आजपासून १४ दिवस ते घरीच विलगीकरणात राहणार आहेत.

अभिषेक व त्यांच्या कुटुंबाने आणि जवळगावकर यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे आभार मानले. आशा कठीण प्रसंगी डॉ. गोऱ्हे यांनी दिलेले प्रोत्साहन व केलेली मदत विसरता येणार नसल्याचे सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like