Pune : पुणे आय एस आय एस मोड्युल प्रकरणी फरार शाहनवाज दिल्ली पोलिसांच्या हाती

एमपीसी न्यूज – दिल्लीत इसिसच्या संशयित दहशतवाद्याला (Pune ) अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने राष्ट्रीय तपास संस्थेचा  मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहनवाज उर्फ शफी उज्जा- टक केली आहे. एनआयएने शाहनवाजवर तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

Pimpri : देशभ्रमण करणारे संजय कदम यांचा कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे सत्कार

प्रकरणातील फरार असलेला शाहनवाज हा दिल्लीचा रहिवासी असून तो व्यवसायाने इंजिनिअर आहे. पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून तो दिल्लीत राहत होता, दिल्ली स्पेशल सेल अजूनही त्याची चौक नाहे.

शाहनवाजची चौकशी केल्यानंतर स्पेशल सेलने दिल्लीत छापा टाकला, ज्यामध्ये आयएसच्या नवीन दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश झाला. शहानवाजची चौकशी केल्यानंतर विशेष कक्षाने 3 ते 4  ताब्यात घेतले आहे.

स्पेशल सेलने आणखी दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. यातील एक दहशतवादी दिल्लीबाहेरून पकडला गेला आहे. आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

त्यांच्याकडून साहित्यही जप्त करण्यात आले आहे. यादरम्यान दिल्लीत मोठ्या दहशतवादी घटनेची योजना समोर आली आहे. दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल याबाबत पत्रकार परिषदही घेऊ (Pune ) शकते.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.