Pune : पोपटाच्या त्रासाची तक्रार केली म्हणून शिवीगाळ करून मारण्याची धमकी

एमपीसी न्यूज : पोपट वारंवार शिट्टी मारत असल्याने तक्रार केली असता पोपट मालकाने शिवीगाळ केल्याने पुण्यात पोपटाच्या मालकावर गुन्हा (Pune) दाखल करण्यात आला आहे. याबाबत खडकी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी दिली.

फिर्यादी व आरोपी दोघे महात्मा गांधी वसाहत, तुळशी मार्केट शेजारी, शिवाजीनगर येथे एकमेकांच्या शेजारी राहतात. फिर्यादी हे ज्येष्ठ नागरिक आहेत. ते आरोपीच्या घरासमोर राहतात. ही घटना आज दुपारी घडली. आरोपी यांचा पोपट सारखा ओरडत असतो. फिर्यादी यांनी तुमच्या पोपटामुळे आम्हाला त्रास होतो, तुम्ही तो दुसरीकडे कुठेतरी ठेवा, असे म्हंटले असता, आरोपी यांनी शिवीगाळ करून तक्रारदार यांना मारण्याची (Pune) धमकी दिली आहे.

Chikhali Power cut: चिखली येथील विद्युत पुरवठा सकाळपासून खंडित, हजारो नागरिकांना त्रास

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.